वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

संतांनी सरता केलो तै

🙏 3. संत तुकाराम · ABH-080513 · अभंग क्र. ३२००

3200.
संतांनी सरता केलो तैसेपरी । चंदनी ते बोरी व्यापियेली ॥१॥
गुण दोष याती न विचारिता काही । ठाव दिला पायी आपुलिया ॥२॥
तुका म्हणे आले समर्थाच्या मना । तरि होय राणा रंक त्याचा ॥३॥

अर्थ :
चंदनाच्या झाडाजवळ जर बोरीचे झाड असेल तर चंदनाच्या सुगंधाने ते बोरीचे झाडही व्यापून जाते त्याप्रमाणे संतांच्या संगतीमध्ये मी राहिलो आणि संतांनी देखील जगामध्ये मला त्यांच्यासारखेच सरते केले. संतांनी माझ्या गुण, दोष, जात याचा काहीही विचार केला नाही त्यांनी मला त्यांच्या पायाच्या ठिकाणी आश्रय दिला आहे ठावठिकाणा दिला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जर समर्थाच्या मनात आले तर दरिद्री मनुष्याचा देखील राजा होतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग