वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

द्रव्य घेऊनिया कथा ज

🙏 3. संत तुकाराम · ABH-080810 · अभंग क्र. ३१६४

3164.
द्रव्य घेऊनिया कथा जरी करी । तरी भंगो हरी देह माझा ॥१॥
माझी कथा करा ऐसे म्हणे कोणा । तरी नारायण जिव्हा झडो ॥धृपद॥
साह्य तू झालासी काय उणे तुपे । आणीक भूतांपे काय मागो ॥२॥
तुका म्हणे सर्व सिद्धी तुझे पायी । तू माझा गोसावी पांडुरंगा ॥३॥

अर्थ :
मी जर द्रव्य घेऊन भारी कथा करत असेल तर हे हरी त्या क्षणीच माझा देह भंग पावो. हे नारायणा, माझी कथा ठेवा, माझे किर्तन ठेवा असे जर मी कोणाला म्हणत असेल तर त्याचवेळी माझी जीभ गळून पडो. अहो देवा तुमच्याजवळ काय उणे आहे मग तुम्ही जर मला प्रत्यक्ष साहाय्य करणारे झाले आहात मग इतर या मनुष्यांना मी काय मागू ? तुकाराम महाराज म्हणतात, देवा अरे पाडूरंगा तू माझा स्वामी आहेस सर्व सिध्दी तुझ्या पायी लोळण घेतात, तुझी सेवा करतात आणि प्रत्यक्ष तूच मला साहाय्य करत आहेस तर मग मी द्रव्य घेऊन कथा तरी का करत बसावी ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग