वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

ज्याची जया आस । तयाज

🙏 3. संत तुकाराम · ABH-080738 · अभंग क्र. ३१६३

3163.
ज्याची जया आस । तयाजवळी त्या वास ॥१॥
येर जवळी ते दुरी । धेनु वत्स सांडी घरी ॥धृपद॥
गोडी प्रियापाशी । सुख उपजे येरासी ॥२॥
तुका म्हणे बोल । घडे तयाठायी मोल ॥३॥

अर्थ :
ज्याला ज्या गोष्टीची किंवा ज्या व्यक्तीची इच्छा अपेक्षा असते ती गोष्ट भले तर त्याच्यापासून कितीही दूर असो परंतू मनाने ती त्याच्याजवळच राहते. नाहीतर एखादी वस्तू किंवा एखादी व्यक्ती आपल्याजवळ असली आणि त्या व्यक्तीविषयी किंवा त्या गोष्टीविषयी आपल्या मनात प्रेमच नसेल तर ती व्यक्ती जवळ असून देखील दूर असल्यासारखेच आहे जसे गाय वासराला जन्म देते आणि त्या वासराला सोडून रानात चरण्यासाठी तर जाते परंतू मनाने ती त्या वासराजवळच वास करते. एखादया प्रिय व्यक्तीविषयी आपल्या अंत:करणामध्ये गोडी असते आणि त्याची भेट जर आपल्याला झाली तर त्याच्यामध्ये व आपल्यामध्ये सुख उत्पन्न होते. तुकाराम महाराज म्हणतात, आणि आपण अशाच व्यक्तीजवळ महत्वाचे बोल बोलत असतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग