वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

प्राक्तनाच्या योगे आ

🙏 3. संत तुकाराम · ABH-080699 · अभंग क्र. ३१८३

3183.
प्राक्तनाच्या योगे आळशावरी गंगा । स्नान काय जगा करू नये ॥१॥
उभी कामधेनु मांगाचे अंगणी । तिसी काय ब्राम्हणी वंदू नये ॥धृपद॥
कोढियाचे हाते परिसे होय सोने । अपवित्र म्हणोन घेऊ नये ॥२॥
यातिहीन झाला गांवींचा मोकासी । त्याच्या वचनासी मानू नये ॥३॥
भावारूढ तुका मुद्रा विठोबाची । न मनी तयांची तोंडे काळी ॥४॥

अर्थ :
चांगले योग आल्यानंतर आळशाच्या कल्याणाकरता गंगा आली तर इतर लोकांनी त्यामध्ये स्नान करु नये काय ? एखादया मांग व्यक्तीच्या दारामध्ये कामधेनू उभी राहिली तर तिला ब्राम्हणाने वंदन करु नये काय ? एखादयाला कृष्ठरोग असेल व त्याच्या हातामध्ये परीस असेल व त्या परीसाचा स्पर्श त्याने लोखंडाला केला व त्या लोखंडाचे सोने झाले तर ते सोने अपवित्र आहे असे म्हणून ते घेऊ नये काय ? गावचा अधिकारी जरी हीन जातीचा असला तरी त्याची आज्ञा मानू नये काय ? तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे मी नीच जातीतील म्हणजे कुणबीमध्ये जन्माला जरी आलो असलो तरी मी भक्तीभावावर आरुढ झालेलो आहे आणि माझ्याजवळ विठोबाची मुद्रा म्हणजे शिक्का आहे त्यामुळे माझा उपदेश सर्वांनी मान्य करावा कारण तो जगाच्या हितासाठी आहे जे कोणी माझा उपदेश मानणार नाहीत त्यांचे तोंड काळे होतील.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग