वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

तुज काय करू मज एक सा

🙏 3. संत तुकाराम · ABH-080878 · अभंग क्र. ३१९१

3191.
तुज काय करू मज एक सार । अमृतसागर नाम तुझे ॥१॥
काय उणे आम्हा तयाचिये पोटी । गोविता हे कंठी कामधेनु ॥धृपद॥
नोळखे तानुले माय ऐसी कोण । वोरसे देखून शोक त्याचा ॥२॥
जो नाही देखिला याचक नयनी । तो पावे घेउनि लज्जा दान ॥३॥
नामासाठी प्राण सांडियेला रणी । शूर ते भांडणी न फिरती ॥४॥
तुका म्हणे आम्ही गाता गीती भला । भेटूनी विठ्ठला काय चाड ॥५॥

अर्थ :
अरे देवा तुझे मी काय करु? माझ्यासाठी एकच सर्व काही आहे ते म्हणजे अमृतापेक्षाही गोड असे तुझे नाम. देवा तुझे नाम म्हणजे कामधेनू आहे त्या कामधेनूच्या पोटामध्ये काय कमी आहे आणि तीच नामरुपी कामधेनू आम्ही आमच्या कंठामध्ये बांधली आहे मग आम्हाला काय कमी पडणार आहे ? आपल्या तान्ह्या बालकाला ओळखणार नाही अशी कोणती माता आहे उलट तान्ह्या बालकाचे रडणे ऐकूनच ती माता त्याला प्रेमाने जवळ घेऊन स्तनपान देते. याचकाला पाहिले न पाहिले तोच त्याच्याकडे जाऊन जो दाता दान देतो तोच खरा दाता होय मग याचकाने कोणतेही दान मागितले तरी तो दान देण्यास लाजेल काय ? देवा जो आपले नाम राखण्यासाठी रणांगणामध्ये वेळप्रसंगी प्राणही देण्यास तयार होतो तो खरा शूर होय मग तो शूर व्यक्ती सामान्य भांडणामध्ये माघारी कधीही फिरत नाही त्याप्रमाणे देवा मी तुझे नाम नेहमी घेत राहीन मग कसाही प्रसंग असो. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला अरे तुझे नाम गीतरुपाने गायिले तर आम्हाला ते अधिकच चांगले वाटतो मग तुला आम्ही भेटण्याची आवड तरी का धरावी ?

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग