वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

साच हा विठ्ठल साच हे

🙏 3. संत तुकाराम · ABH-080715 · अभंग क्र. ३१९४

3194.
साच हा विठ्ठल साच हे करणे । संत जे वचने बोलियेले ॥१॥
साच ते स्वहित साच ते प्रचित । साच वेद नीत सांगतील ॥२॥
तुका म्हणे घेती साच साच भावे । लटिके वर्म ठावे नाही त्यासी ॥३॥

अर्थ :
एक विठ्ठलच खरा आहे आणि त्याची भक्ती करणे हेच खरे आहे असे संतांचे वचन देखील खरेच आहे. वेदाने जी धर्मनीती सांगितली आहे ती देखील खरी आहे व त्याप्रमाणे जे वागतात त्यांचे स्वहित होते आणि त्यांना प्रचिती म्हणजे आत्मसाक्षात्कार देखील होतो हे देखील खरेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जे खरे भक्त भाविक आहेत तेच संतांचे खरे वचन मान्य करतात अगदी भक्तीभावपूर्वक मान्य करतात आणि जे खोटे वागणारे आहेत अज्ञानी आहेत त्यांना संतांच्या वचनाचे खरे वर्मच ठाऊक नसल्यामुळे ते त्यांचा स्वीकार करत नाहीत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग