वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 113. संसार - अभंग ३०८३ ते ३१७७

नेम धरी विठ्ठलामीं ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085265 · अभंग क्र. ३१७१

3171.
नेम धरी विठ्ठलामीं । पडुं नको वाउगा भ्रमी । सांगतसे गृहस्थाश्रमीं । साधन सोपे ॥१॥
करी नामस्मरण । वाचे म्हणे नारायण । चुकेल पतन । यातायाती ॥२॥
इहलोक परलोक । धन्य होती सकळीक । उभय कुळ पावन देख । नाम स्मरता ॥३॥
कलीमाजी सोपे वर्म । उच्चारी तू श्रीराम । आणिक नको श्रम । वाउगाची ॥४॥
जाउनी पाहे तुं पंढरी । उभा असे विटेवरी । एका जनार्दनी धरी । चरण त्याचे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग