करावे कीर्तन । मुखे
3189.
करावे कीर्तन । मुखे गावे हरीचे गुण ॥१॥
मग काही नव्हे बाधा । काम दुर्जनाच्या क्रोधा ॥धृपद॥
शांति खड्ग हाती । काळासी ते नागविती ॥२॥
तुका म्हणे दाता सखा । ऐसा अनंतासारिखा ॥३॥
अर्थ :
हरीचे किर्तन करावे व मुखाने हरीचे गुणगान गावे. मग त्याला दुर्जन अशा कामक्रोधाची बाधा होणे शक्य नाही. शांतीरुपी तलवार म्हणजे खडग ज्याच्या हातात आहे तो काळाला देखील नागवीत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याला अनंतासारखा दाता सखा म्हणून लाभला त्याला काय कमी पडणार आहे तर काहीच नाही.
