वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

संतांच्या पादुका घेई

🙏 3. संत तुकाराम · ABH-080524 · अभंग क्र. ३२०२

3202.
संतांच्या पादुका घेईन मोचे खांदी । हाती टाळ दिंडी नाचेन पुढे ॥१॥
भजनविधी नेणे साधन उपाय । सकळ सिद्धी पाय हरीदासांचे ॥धृपद॥
ध्यान गति मति आसन समाधि । हरीनाम गोविंदी प्रेमसुख ॥२॥
नेणता निर्लज्ज नेणे नादभेद । सुखे हा गोविंद गाऊ गीती ॥३॥
सर्व जोडी मज गोत आणि वित्त । तुका म्हणे संतमहंत पाय ॥४॥

अर्थ :
मी संतांच्या पादूका व त्यांच्या वहाणा खांदयावर घेईन व त्यांच्यापुढे हातात टाळ व वीणा घेऊन नाचेन. देवाचे भजन देवाची विधीवत पूजा व इतर साधने उपाय हे मी काहीही जाणत नाहीत माझ्यासाठी तर हरीदासांचे पायच सर्व प्रकारचे साधने आहेत. ध्यान, गती, मती, आसन, समाधी हे मला काहीही कळत नाही परंतू हरी आणि गोविंद या नामाने मला सुख आणि प्रेम दोन्ही मिळते. मला नाद भेद ताल स्वर हे काहीही कळत नाही निर्लज्ज होऊन सुखाने आहे त्या सुरामध्ये गोविंदाचे आम्ही गीत गाऊ. तुकाराम महाराज म्हणतात, संत महंत यांचे पायच माझ्यासाठी सर्व प्रकारचे लाभ आहेत तेच माझ्यासाठी आप्त इष्ट नातेवाईक आहेत व तेच माझ्यासाठी धन वित्त आहेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग