वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

पावलो प्रसाद इच्छा क

🙏 3. संत तुकाराम · ABH-080732 · अभंग क्र. ३२०८

3208.
पावलो प्रसाद इच्छा केली तैसी । झाले या चित्तासी समाधान ॥१॥
मायबाप माझा उभा कृपादानी । विटे सम जोडूनि पादांबुजे ॥धृपद॥
सांभाळासी येऊ नेदीच उणीव । अधिकारगौरव राखे तैसा ॥२॥
तुका म्हणे सर्व अंतर्बाह्य आहे । जया तैसा राहे कवळूनी ॥३॥

अर्थ :
मी ज्या प्रकारची इच्छा केली त्या प्रकारचा मला प्रसाद मिळाला त्यामुळे माझ्या चित्ताला समाधान झाले आहे. माझा मायबाप कृपादान देणारा आहे तो आपले दोन्ही समचरण विटेवर ठेवून उभा आहे. भक्ताचा जसा अधिकार असेल तसा त्याचा गौरव करतो व त्याच्या भक्तांचा सांभाळ करण्यासाठी कोणत्याही प्रकारची उणीव कमतरता तो येऊ देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझा देव सर्वत्र आतरबाह्य व्यापून उरलेला आहे परंतू ज्याचा जसा भाव असेल तसा देव त्याच्याजवळ राहातो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग