विवाद वाद हे तो अधम
3206.
विवाद वाद हे तो अधम लक्षण । भक्तीचें कारण न साधे येणे ॥१॥
मुख्य एक करी एकविधपण । सम दरुशने देखे जगी ॥२॥
नर अथवा नारी असो भलते याती । वंदावे विभूति म्हणोनिया ॥३॥
एका जनार्दनी बोध धरी मना । होऊनियां साना सानाहुनी ॥४॥