वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

पुण्य फळले बहुता दिव

🙏 3. संत तुकाराम · ABH-080799 · अभंग क्र. ३२०४

3204.
पुण्य फळले बहुता दिवसा । भाग्यउदयाचा ठसा । झालो सन्मुख तो कैसा । संतचरण पावलो ॥१॥
आजि फिटले माझे कोडे । भवदुःखाचे साकडे । कोंदटले पुढे । परब्रम्ह सावळे ॥धृपद॥
आळिंगने संतांचिया । दिव्य झाली माझी काया । मस्तक हे पाया । वरी त्यांच्या ठेवितो ॥२॥
तुका म्हणे धन्य झालो । सुखे संतांचिया धालो । लोटांगणी आलो । पुढे भार देखोनी ॥३॥

अर्थ :
आज माझे खूप दिवसाचे पुण्य फळाला आलेले आहे आणि माझ्या भाग्याचा उदय झाल्याचा मला दिसत आहे. पहा मी या संतांच्या समोर कसा उभा राहिलो आहे आज मला संतचरण प्राप्त झाले आहे. आज माझे सर्व कोडे आणि भवदु:खाचे साकडे नाहीसे झाले आहे. आणि माझ्यापुढे संत उभे आहेत परंतू मला ते सावळे परब्रम्हच दिसत आहे व सर्वत्रच ते भरलेलेही दिसत आहेत. संतांच्या आलिंगनाने माझे शरीर परम पवित्र झाले असून संतांनी मला आलिंगन दिले व माझी काया म्हणजे शरीर दिव्य झाले. त्यांच्या पायावर मी मस्तक ठेवतो. तुकाराम महाराज म्हणतात, मी आज धन्य झालो कारण मला संतांचे दर्शन झाले व संत दर्शनाच्या सुखाने मी तृप्त झालो. आणि पुढे संतांचा समुदाय पाहून मी लोटांगण घेत त्यांच्यापुढे आलो आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग