बोलिलो उत्कर्षे । प्
3184.
बोलिलो उत्कर्षे । प्रेमरस दासत्वे ॥१॥
साच करिता नारायण । जया शरण गेलो तो ॥धृपद॥
समर्थ तो आहे ऐसा । धरिली इच्छा पुरवी ॥२॥
तुका म्हणे लडिवाळाचे । द्यावे साचे करूनिया ॥३॥
अर्थ :
मी उत्कर्षाने परंतू प्रेमरसामध्ये दास्यत्वाच्या नात्याने जे काही बोललो आहे, तेच माझे बोलणे ज्या नारायणाला मी शरण गेलो आहे तोच खरे करील. तुकाराम महाराज म्हणतात, त्या नारायणाला असे वाटते की, आपल्याला शरण आलेल्या लाडक्या भक्ताचे बोललेले वचन खरे करुन दाखवावे.
