उपमन्यु सान देवासी क
3202.
उपमन्यु सान देवासी कळवळ । क्षीरसिंधु तात्काळ दिला त्यासी ॥१॥
सानपणे अर्जुनें साधियेले काज । श्रीकृष्ण निजगूज सांगतसे ॥२॥
सानपणे उद्धव झालासे विमुक्त । सानप्णें तो निश्चित तारियेला ॥३॥
सानपणे सुख गोपाळ गौळणी । एका जनार्दनी सदोदित ॥४॥
