वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

चोरासी चांदणे वेश्ये

🙏 3. संत तुकाराम · ABH-080867 · अभंग क्र. ३१८६

3186.
चोरासी चांदणे वेश्येसी सेजार । परिसेंचि खापर काय होय ॥१॥
दुधाचे आधणी वैरिले पाषाण । कदा काळी जाण पाकनव्हे ॥२॥
तुका म्हणे जरि पूर्वपुण्ये सिद्धि । तरिच राहे बुद्धी संतसंगी ॥३॥

अर्थ :
चोराला चांदणे, वेश्येला चांगला शेजारी जसा नको वाटतो अगदी त्याप्रमाणे खापराला जरी परीसाचा स्पर्श झाला तरी त्या खापराचे सोने काही होत नाही त्याप्रमाणे पापी मनुष्याला संतसज्जनांची संगती नको वाटते आणि समजा यदाकदाचित जरी झाली तरी त्याचा काय उपयोग होणार ? आदन आलेल्या दुधामध्ये जरी दगड टाकला तरी तो दगड कधीही शिजणार नाही हे जाणून घ्यावे. तुकाराम महाराज म्हणतात, जर तुमचे पुर्वपुण्य सिध्द असेल तरच तुमची बुध्दी संतांच्या ठिकाणी स्थिर राहाते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग