विचा केला ठोबा । म्ह
3185.
विचा केला ठोबा । म्हणोनि नांव तो विठोबा ॥१॥
का रे नेणा त्याचे नांव । काय वेदासि नाही ठाव ॥धृपद॥
शेष स्तुती प्रवर्तला । जिव्हा चिरूनि पलंग झाला ॥२॥
तुका म्हणे सत्ता । ज्याची काळाचिये माथा ॥३॥
अर्थ :
वि म्हणजे भेद म्हणजेच जीव ब्रम्हातील भेद. ठोबा म्हणजे नाश म्हणजेच जीव ब्रम्हातील भेदाचा नाश किंवा वि म्हणजे गरुड आणि ठोबा म्हणजे आधार म्हणजेच गरुडाच्या आधाराने जो सर्वत्र फिरतो अशा भगवान विष्णूला देखील विठोबाच म्हणतात. अरे मग तुम्ही विठोबाचे नांव का घेत नाहीत त्याचे नांव का जाणून घेत नाहीत वेदाला विठोबाचे नांव माहित नाही काय तर आहे वेदाला विठोबाचे नांव माहित आहे. हजार मुख असणारा शेषनाग विठोबाची स्तुती करण्यासाठी पवृत्त झाला त्याने विठोबाची स्तुती केली परंतू विठोबाचे पूर्ण स्वरुप त्याला सांगता आले नाही सांगता सांगता त्याच्या जिव्हा फाटल्या मग तो विठोबाला शरण गेला व त्याचा पलंग झाला. तुकाराम महाराज म्हणतात, अहो ज्याची सत्ता काळाच्या माथ्यावर आहे अशा देवाचे नांव विठोबा आहे व त्या विठोबाचे नांव तुम्ही आत्मस्वरुपाने जाणून घ्या व त्याचे स्मरण करत राहा.
