वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

नर नारी बाळे अवघा ना

🙏 3. संत तुकाराम · ABH-080716 · अभंग क्र. ३१८१

3181.
नर नारी बाळे अवघा नारायण । ऐसे माझे मन करी देवा ॥१॥
न यो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद । अवघा गोविंद निःसंदेह ॥धृपद॥
असावे म्या सदा विषयी विरक्त । काया वाचा चित्त तुझे पायी ॥२॥
करोनिया साह्य पुरवी मनोरथ । व्हावे कृपावंत तुका म्हणे ॥३॥

अर्थ :
देवा सर्व स्त्री पुरुष लहान बाळे ही नारायणाचीच रुप आहेत असे मला वाटावे असेच तू कर. काम, क्रोध, व्देष, निंदा याप्रकारचे व्दंव्द माझ्या मनामध्ये येऊ देऊ नका आणि सर्वत्र गोविंदच आहे अशी निसंदेह भावना माझ्या मनामध्ये यावी. देवा मी नेहमी विषयी विरक्त विषयापासून वेगळा असावा माझी काया, वाचा आणि मन नेहमी तुझ्या पायाच्याजवळच असावे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू कृपावंत हो आणि मला साहाय्य करुन माझे मनोरथ तू पूर्ण कर.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग