वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

प्रपंच परमार्थ संपाद

🙏 3. संत तुकाराम · ABH-080582 · अभंग क्र. ३१७०

3170.
प्रपंच परमार्थ संपादोनि दोन्ही । एक ही नीदानी न घडे त्यासी ॥१॥
दोही पेवावरी ठेवू जाता हात । शेवटी अपघात शरीराचा ॥२॥
तुका म्हणे तया दोहीकडे धक्का । शेवटी तो नरकामाजी पडे ॥३॥

अर्थ :
परमार्थ आणि प्रपंच मी दोन्ही बरोबर साध्य करीन असे जर कोणी म्हणेल किंवा ठरवेल तर त्याच्याकडून एकही व्यवस्थित घडणार नाही. दोन्ही पेवांवर हात ठेवू पाहिले तर शरीराचा अपघात होतो. तुकाराम महाराज म्हणतात, प्रपंच आणि परमार्थ हे दोन्हीही एकाच वेळी जो साध्य करण्याचा प्रयत्न करतो त्याला दोन्ही कडेही धक्का मिळतो आणि शेवटी तो नरकामध्येच पडतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग