स्वप्नीं चालता लवलाह
3191.
स्वप्नीं चालता लवलाही । आडामध्यें पडिला पाही ॥१॥
घाबरूनी म्हणे धांवा । तैसे भुलले जीवजीवा ॥२॥
मृगजळ भासे नीर । वाया मागे पसर ॥३॥
सावध होऊनि जंव पाहे । वाया स्वप्न मिथ्या आहे ॥४॥
एका जनार्दनी भुलले । वाया गेले अधोगती ॥५॥
