सानपणे धूरु अढळी बैस
3201.
सानपणे धूरु अढळी बैसला । सानपणे केला कृतकृत्य ॥१॥
सानपणे प्रल्हादे साधियेलें काज । सानपणे सहज बळी पूजी ॥२॥
सानपणे बिभीषण शरण आला । राज्यधर केला श्रीरामे त्यासी ॥३॥
एका जनार्दने सानपणावांचुनी । ब्रह्माज्ञान जनी नातुडेची ॥४॥
