पळभरी संतसंगती । कोट
3164.
पळभरी संतसंगती । कोटीयुगें तया विश्रांती । ऐसे बोलतसे श्रुती । पाहे पा जना ॥१॥
वेदशास्त्रा पुराण । महिमा संतांचाचि जाण । शुकादिक रंगून । रंगले रंगी ॥२॥
अर्जुना उपदेशिलें । उद्धवातें बोधिले । व्यासादिक रंगले । हृदयी सदा ॥३॥
ते दृढ हृदयी धरी । आणीक नको पाहुं फेरी । एका जनार्दनी धरी । हृदयामाजीं ॥४॥
