वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

भक्ती ज्याची थोडी ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-080505 · अभंग क्र. ३१९९

3199.
भक्ती ज्याची थोडी । पूर्ण विषयांची गोडी ॥१॥
तो नरचि नव्हे पाही । खर जाणावा तो देही ॥धृपद॥
भजन पूजन ही नेणे । काय स्वरूपासी जाणे ॥२॥
तुका म्हणे त्याला । भोवंडून बाहेर घाला ॥३॥

अर्थ :
ज्याच्या अंत:करणामध्ये भक्ती थोडी परंतू विषयाची पूर्ण गोडी आहे, त्याला मनुष्य म्हणून पाहूच नका तर तो मनुष्यरुपाने आलेला गाढवच आहे असे जाणावे. अहो जो भजन पूजनही जाणत नाही ज्याला भजन पूजन माहित नाही तो हरीच्या मूळस्वरुपाला काय जाणणार आहे ? तुकाराम महाराज म्हणतात, जर तुमच्या घरी वरवर भक्तीचे सोंग दाखवणारा आणि संपूर्ण अंत:करणात विषयाची आसक्ती ठेवणारा असा कोणी मनुष्य आला तर तुम्ही त्याला गोल गोल फिरवा आणि बाहेर हाकला.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग