वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

इंद्रियांसी नेम नाही

🙏 3. संत तुकाराम · ABH-080757 · अभंग क्र. ३२०६

3206.
इंद्रियांसी नेम नाही । मुखी राम म्हणोनि काई ॥१॥
जेवि मासीसंगे अन्न । सुख नेदी ते भोजन ॥धृपद॥
कीर्तन करावे । तैसे करूनी दावावे ॥२॥
हे तो अंगी नाही चिन्हे । गाइले वेश्येच्या ढव्याने ॥३॥
तुका म्हणे रागा । संत शिवू नेदिती अंगा ॥४॥

अर्थ :
जरी इंद्रियांचा निग्रह केला नाही तर मुखाने केवळ रामनाम घेण्यात काय उपयोग आहे ? जर अन्नामध्ये माशी पडली आणि आपण तसेच भोजन केले तर ते भोजन आपल्याला सुख देत नाही आपल्याला लगेच वांत्या होतील. ज्याप्रमाणे आपण किर्तनात बोलू त्याप्रमाणेच आपण बाहेर देखील वर्तन आपल्या बोलण्याप्रमाणेच करुन दाखवावे. आणि आपण ज्या प्रकारचे विषय किर्तनात मांडू जसे आपण किर्तनात बोलू त्याप्रमाणे आपल्या अंगी चिन्हे दिसले नाही तर आपले बोलणे म्हणजे वेश्येने गायिलेल्या गाण्याप्रमाणे होईल. तुकाराम महाराज म्हणतात जे कोणी खरे संत आहेत ते आपल्या अंगाला राग क्रोध याला शिवू देखील देत नाहीत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग