संकोचितो जीव महत्वाच
3197.
संकोचितो जीव महत्वाच्या भारे । दासत्वचि बरे बहु वाटे ॥१॥
कळावी जी माझी आवडी हे संता । देणे तरि आता हेचि द्यावे ॥धृपद॥
तुमचे चरण पावविलो सेवा । म्हणउनि हेवा हाचि करी ॥२॥
विनवुनी तुका वंदितो चरण । लेखा रजरेण चरणींचा ॥३॥
अर्थ :
हे संतजनहो मला मोठेपणा मिळाला की त्या मोठेपणाचा ओझ्याने माझा जीव संकुचित होतो त्यापेक्षा तुमचे दास्यत्वच मला खूप आवडते. त्यामुळे हे संतजनहो तुम्ही माझी आवड जाणून घ्यावी आणि तुम्हाला मला काही दयायचेच असेल तर एवढे तुम्ही मला दयावे, की तुमची तुमच्या चरणांची एकदा की तुमच्या चरणांची सेवा मी केली की तुमच्या चरणांची प्राप्ती मला होईल आणि हाच हेवा मी करीत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, एवढी विनंती करुन मी तुमच्या चरणांना वंदन करतो आणि तुमच्या चरणाचा मी एक रज:कण आहे एवढेच तुम्ही माना.
