काय मनुष्यदेहाचें हो
3183.
काय मनुष्यदेहाचें होय । नाशिवंत जाय शेवटी ॥१॥
हे तो काळाचे खाजे सहजी । कांही तरी राजी हरि करा ॥२॥
जाता आयुष्य न लगे वेळ । स्मरें घननीळ रामराणा ॥३॥
एका जनार्दनी भाकी कींव । वाया हांव धरूं नका ॥४॥