अदृष्टी असेल जे जे व
3187.
अदृष्टी असेल जे जे वेळे । ते ते मिळेल ते ते काळे ॥१॥
ऐशी प्रारब्धाची गती । ब्रह्मादिका न चुकतीं ॥२॥
जे जे होते ज्या संचितीं । ते तयासवे चालती ॥३॥
जैशी जैशी कर्मरेषा । तैसे भोगणें सहसा ॥४॥
एका जनार्दनी भोग । भोगविल्याविण न चुके सांग ॥५॥
