वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

चित्ता मिळे त्याचा स

🙏 3. संत तुकाराम · ABH-080629 · अभंग क्र. ३१७३

3173.
चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर । क्षोभविता दूर तेचि भले ॥१॥
ऐसी परंपरा आलीसे चालत । भलत्याची नीत त्यागावरी ॥धृपद॥
हो का पिता पुत्र बंधु कोणी तेही । विजाति संग्रही धरू नये ॥२॥
तुका म्हणे सत्य पाळावे वचन । अन्यथा आपण करू नये ॥३॥

अर्थ :
ज्याची संगती केल्यावर आपल्या चित्ताला त्याच्या विषयी ओढ वाटते त्याची संगती करावी आणि ज्याच्या भेटीमुळे आपल्या चित्तात क्षोभ निर्माण होतो त्याच्यापासून दूर राहाणेच चांगले. अशी परंपरा पहिल्यापासूनच चालत आलेली आहे ज्याच्यापासून आपल्याला त्रास होतो त्याचा त्याग करणे ही सामान्य माणसांची नीतीच आहे आपण परमार्थ करत असताना आपल्याला कोणी आड येत असेल मग तो पिता असो पुत्र किंवा बंधू कोणीही असो त्यांची संगतीही धरु नये. तुकाराम महाराज म्हणतात, आपण जे सत्यवचन बोलू ते आपण नीट पाळावेत अन्यथा कोणत्याही प्रकारची वचने कोणालाही देऊच नयेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग