वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

मथनासाठी धर्माधर्म ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-080911 · अभंग क्र. ३१८७

3187.
मथनासाठी धर्माधर्म । त्याचे वर्म नवनीत ॥१॥
तेचि ते घाटू नये । आले जाय नासूनि ॥धृपद॥
सांभाळावे वरावर । वर्म दूर नवजावे ॥२॥
तुका म्हणे धाले पोट । मग बोटचांटणी ॥३॥

अर्थ :
दही मंथन करताना प्रयत्न केला जातो व त्या प्रयत्नाचे शेवटचे वर्म म्हणजे लोणी होय. एकदा की ताकावर लोणी आले की पुन्हा त्याला घोटू नये त्याचे पुन्हा मंथन करु नये जर मंथन केलेच तर आलेले लोणी देखील नासून जाते. एकदा की लोणी वर आले की ते अलगदपणे काढून घ्यावे अगदी त्याप्रमाणे हरीची प्राप्ती करुन घेण्यासाठी जे योग्य साधन आहे त्याचा अवलंब करावा त्या साधनेपासून आपण दूर जाऊ नये हे वर्म लक्षात ठेवावे. तुकाराम महाराज म्हणतात, एकदा की जर पोट भरले तर मग बोटे चाटणे जसे व्यर्थ ठरते त्याप्रमाणे एकदा की जर हरीची प्राप्ती झाली की मग धर्माधर्माचे पालन करणे हे देखील व्यर्थच ठरते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग