वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

देव कैचा तया दुरी ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-080840 · अभंग क्र. ३१९८

3198.
देव कैचा तया दुरी । भाका बरी करुणा ॥१॥
आळवित्या न लगे घर । माय जाणे रे भातुके ॥धृपद॥
नावे तरी ज्याचा भार । पैल पार जवळी त्या ॥२॥
आता परदेशी तुका । झाला लोकांवेगळा ॥३॥

अर्थ :
देवाला वरच्यावर सारखी करुणा भाकत राहा मग तो तुमच्यापासून दूर कसा राहील ? विठाबाई माऊलीला प्रेमाने आळविले की मग तुम्हाला कोणाचीही आधाराची गरज लागणार नाही. कारण ती तुमच्या तहान भूकेची देखील चिंता वाहाते आणि तुमच्या खाण्यापिण्याची देखील व्यवस्था ती करतेच. ज्याने आपला सर्वस्व भार नामरुपी नौकेवर टाकला त्याला भवनदीचे पैलतीर पार करण्यास काहीच अडचण नाही कारण पलीकडचे तीर त्याच्यासाठी फारच जवळ असते. तुकाराम महाराज म्हणतात, मी माझा सर्वभार नामावर टाकला आहे व परदेशी झालो आहे आणि सर्व लोकापेक्षा वेगळा होऊन राहिलो आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग