वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

पंढरीचा वास धन्य तेच

🙏 3. संत तुकाराम · ABH-080541 · अभंग क्र. ३१७९

3179.
पंढरीचा वास धन्य तेचि प्राणी । अमृताची वाणी दिव्य देहो ॥१॥
मूढ मतिहीन दुष्ट अविचारी । ते होती पंढरी दयारूप ॥धृपद॥
शांति क्षमा अंगी विरक्ति सकळ । नैराश्य निर्मळ नारी नर ॥२॥
तुका म्हणे नाही वर्णा अभिमान । अवघेचि जीवन्मुक्त लोक ॥३॥

अर्थ :
ज्यांना पंढरीचा सहवास घडतो ते प्राणी धन्य आहेत त्यांची वाणी अमृततुल्य असून त्यांचा देह दिव्य आहे. जे लोक मूर्ख, मतिहीन, दुष्ट, अविचारी आहेत त्यांना पंढरीचा सहवास घडला की ते दयाळू होऊन जातात. व त्या नारीनर म्हणजे स्त्रीपुरुषांच्या अंगी शांती, क्षमा, विरक्ती उत्पन्न होऊन त्यांचे सर्वांग निर्मळ होते व ते नैराश्यहीन होतात. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या अंगी वर्णाभिमान राहात नाही तसेच जे पंढरीत राहतात ते सर्व लोक जीवनमुक्त होतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग