साधनाच्या कोटी । केल
3190.
साधनाच्या कोटी । केल्या आटी होत्या त्या ॥१॥
देव कृपा करी जरी । होय उजरी स्वरूपी ॥धृपद॥
केले होती वृथा श्रम । उपरम न होता ॥२॥
तुका म्हणे कळो आले । सर्व जाले आपरूप ॥३॥
अर्थ :
कोटयावधी साधने केले तरी व्यर्थच ठरत असतात. पण जर देवाने स्वत: कृपा केली तर त्याच्या स्वरुपाचे ज्ञान साधकाला होणे शक्य आहे. जर चित्तामध्ये वैराग्यच नसेल तर केलेले सर्व श्रम व्यर्थच होतात. तुकाराम महाराज म्हणतात, पण माझ्यावर देवाची कृपा झाली व त्यामुळे मला देवाच्या स्वरुपाचे ज्ञान झाले आणि याच कारणामुळे मला सर्व जगच आत्मरुप झाले आहे.
