येणे पंथे बहुत तरले
3166.
येणे पंथे बहुत तरले निश्चिती । आवडी जे गाती विठोबासी ॥१॥
तारक हा मंत्र सोपा पै सर्वासी । उच्चारिता अहर्निशी सर्वसिद्ध ॥२॥
पापा प्रायश्चित कलियुगी नाम । आणिक सोपे वर्म संतसेवा ॥३॥
न लगे दंडन मुंडन ते आटी । नाम घेता होटीं सर्व जोडें ॥४॥
एका जनार्दनी संतांसी शरण । चुके जन्ममरण नाना पीडा ॥५॥
