वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

तांबीयाचे नाणे न चले

🙏 3. संत तुकाराम · ABH-080770 · अभंग क्र. ३१७२

3172.
तांबीयाचे नाणे न चले खऱ्या मोले । जरी हिंडविले देशोदेशी ॥१॥
करणीचे काही न मने सज्जना । यावे लागे मना वृद्धांचिया ॥धृपद॥
हिरियासारिका दिसे शिरगोळा । पारखी ते डोळा न पाहाती ॥२॥
देऊनिया भिंग कामाविले मोती । पारखिया हाती घेता नये ॥३॥
तुका म्हणे काय नटोनिया व्यर्थ । आपुले हे चित्त आपणा ग्वाही ॥४॥

अर्थ :
सोने चांदीचे नाणे हे खऱ्या मोलाचे असते तांब्याचे नाणे कितीही देशोदेशी घेवून हिंडवले तरी ते कोठेही चालणार नाही. कोणतेही कार्य केले तर संतांना सज्जनांना ते कार्य पटायला हवे व त्याची मान्यता संतांकडून यावी लागते त्या नंतर कार्‍याला मान्यता प्राप्त होते. शिरगोळा अगदी हिऱ्याप्रमाणे दिसतो परंतू जो हिऱ्यांचा पारखी आहे तो त्या शिरगोळयाला डोळयाने देखील पाहाणार नाही. काचेवर कृत्रिम प्रक्रिया करुन मोती जरी तयार केला तरी मोत्याचा जो पारखी असतो तो त्याला हातात देखील घेत नाही. तुकाराम महाराज म्हणतात. परमार्थामध्ये उगाचच खोटे नटून म्हणजे व्यर्थ सोंग दाखवून काय उपयोग आहे आपण कसे वागतो, आपले मन कसे आहे याविषयी आपले चित्तच आपल्याला साक्षी असते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग