वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

संगे वाढे सीण न घडे

🙏 3. संत तुकाराम · ABH-080431 · अभंग क्र. ३१९५

3195.
संगे वाढे सीण न घडे भजन । त्रिविध हे जन बहु देवा ॥१॥
याचि दुःखे या जनाचा कांटाळा । दिसताती डोळा नानाछंद ॥धृपद॥
एकविध भाव राहावया ठाव । नेदी हा संदेह राहो चित्ती ॥२॥
शब्दज्ञानी हित नेणती आपुले । आणीक देखिले नावडे त्या ॥३॥
तुका म्हणे आता एकलेचि भले । बैसोनि उगले राहावे ते ॥४॥

अर्थ :
देवा जगामध्ये तीन गुणाचे लोक आहेत. त्यामध्ये रज आणि तम लोक संसाराकडे जास्त करुन प्रवृत्त होतात. त्यामुळे त्यांच्या जीवनात दु:ख वाढत चालते आणि सत्व रजाचे हरिभक्त असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये संतसंगतीने भजन वाढत चालते. त्यामुळे देवा मला आता संगतीचाच कंटाळा आला आहे हे लोक विविध प्रकारच्या छंदामध्ये अगदी रंगून गेले आहेत हे मला माझ्या डोळयांनीच दिसते आहे. त्यामुळे संदेह निर्माण होतो व संदेह निर्माण झाला की चित्तामध्ये जो एकनिष्ठ भक्तीभाव राहीला पाहिजे त्या एकनिष्ठ भक्तीभावालाच चित्तामध्ये राहण्यासाठी ठिकाण राहत नाही. जे लोक शब्दज्ञानी आहेत त्यांना आपले हित कशात आहे हेच कळत नाही तर ते दुसऱ्याला ज्ञान वाटून दुसऱ्याचे काय कल्याण करणार आहेत. त्यामुळे असल्याचे तोंड देखील पाहाणे मला आवडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता एकातामध्ये जावून राहावे व तेथेच नामस्मरण्‍ करावे हेच चांगले.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग