वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 113. संसार - अभंग ३०८३ ते ३१७७

जरी न बनेचि गुरुवचनी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085311 · अभंग क्र. ३१७७

3177.
जरी न बनेचि गुरुवचनीं । तरी बैसोनि सहजासनीं । हेंचि एक निर्वाणी । साधेजे सुख ॥१॥
सकळीं सकळपणें । अखंडरूप पाहणें । साध्य हेंचि साधने । करुनी घेईं ॥२॥
जया संतचरणी नाही भावो । त्यासी लडिवाळ संदेहो । तेथे साधनामाजीं देवो । दिसे कैसा ॥३॥
हेतु मातु अनुमाना । आकळी दृध एकमना । अधिकचि कल्पना । वाढविली ॥४॥
जाणीव नेणीव हे वाड । कल्पनेचें समूळ झाड । तुझे तुजचि आड । उभे ठाकती ॥५॥
नाना हेतु विवंचना । सांडुनियां कल्पना । एका जनार्दना । शरण रिघे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग