भक्ती आम्ही केली सां
3205.
भक्ती आम्ही केली सांडुनी उद्वेग । पावलो हे संग सुख याचे ॥१॥
सुख आम्हा झाले धरिता यांचा संग । पळाले उद्वेग सांडूनिया ॥२॥
तुका म्हणे सुख बहु झाले जिवा । घडली या सेवा विठोबाची ॥३॥
अर्थ :
आम्ही प्रपंचाचा सर्व उद्वेग बाजूला टाकून हरीची भक्ती केली आहे त्यामुळे मला हरीचे संग सुख प्राप्त झाले आहे. आम्ही हरीची संगती धरली त्यामुळे सर्व उद्वेग आम्हाला सोडून पळून गेले व आम्ही सुखी झालो. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला विठोबाची सेवा घडली त्यामुळे या जीवाला खूपच सुख झाले आहे.
