वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

आवडे पंढरी भीमा पांड

🙏 3. संत तुकाराम · ABH-080458 · अभंग क्र. ३१६९

3169.
आवडे पंढरी भीमा पांडुरंग । चंद्रभागा लिंग पुंडलिक ॥१॥
कामधेनु कल्पतरु चिंतामणी । आवडीची धणी पुरवीती ॥२॥
तुका म्हणे जीवा थोर झाले सुख । नाठवे हे भूक तहान काही ॥३॥

अर्थ :
मला पंढरी, भीमा नदी, पाडूरंग, चंद्रभागा, शिवलिंग व पुंडलिक हेच आवडतात. कामधेनू, कल्पतरु, चिंतामणी हे आपल्या मनातील आवडीच्या सर्व इच्छा पूर्ण करतात त्याप्रमाणे पंढरी, भीमा नदी, पाडूरंग, चंद्रभागा, शिवलिंग आणि पुंडलिक हे देखील आमच्या आवडीच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. तुकाराम महाराज म्हणतात, या सर्वांच्या दर्शनाने व त्यांच्या भजनाने मला इतके मोठे सुख झाले आहे की त्या सुखामध्ये मला तहान भूक देखील आठवत नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग