घाली देवावरी भार । आ
3170.
घाली देवावरी भार । आणिक न करी विचार । योगक्षेम निर्धार । चालवील तुझा ॥१॥
वाचे गाय नामावळी । वासुदेवी वाहे टाळीं । प्रेमाचें कल्लोळीं । नित्यानंदें सर्वथा ॥२॥
सोस घेई का रेक वाचे । रामकृष्ण वदता साचे । धरणे उठतें यमाचें । निःसंदेह ॥३॥
शरण एका जनार्दनी । करी रामनाम ध्वनी । कैवल्याचा दानी । रक्षी तुज निर्धारे ॥४॥
