वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

आम्हा भय धाक कोणाचा

🙏 3. संत तुकाराम · ABH-080563 · अभंग क्र. ३१७१

3171.
आम्हा भय धाक कोणाचा रे पाहे । काळ मशक काय मानव हे ॥१॥
आम्हासी ते काय चिंता या पोटाची । माउली आमुची पांडुरंग ॥धृपद॥
काय करावी हे कोणाची मान्यता । करिता अनंता कोण वारी ॥२॥
नाही शीण आम्हा झाले कवतुक । पुनीत हे लोक करावया ॥३॥
तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू । नका चरफडू घ्या रे तुम्ही ॥४॥

अर्थ :
आम्ही हरीचे दास आहोत त्यामुळे आम्हाला कोणाचा धाक आणि कोणाचे भय आहे काळ आमच्यापुढे अगदी मक्षकाप्रमाणे आहे तर सामान्य मनुष्यांची आमच्यापुढे काय कथा आहे ? आम्हाला आमच्या पोटाची कसली चिंता आली आमचे पोट भरणारी आमची पाडूरंग माऊली आहे. आम्हाला कोणी मान्यता जरी दिली तरी त्याच्या मान्यतेची आम्हाला काय गरज आहे आणि काय करायची आम्हाला ती मान्यता प्रत्यक्ष अनंताने आम्हाला मान्यता दिली आम्हाला मोठेपणा दिला आहे आणि अनंताने दिलेल्या मोठेपणाला कोण प्रतिबंध करणार आहे ? लोकांना पुनीत म्हणजे पुण्यवान करणे हे आमच्यासाठी कौतुक नाही तर आमच्यासाठी तो शीण झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अरे मी तर आनंदाचे लाडू खात आहे आणि तो अनंदाचा लाडू तुम्ही देखील घ्या आणि समाधानाने खा उगाच चरफड करु नका.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग