वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 114. मुमुक्षूंस उपदेश - ३१७८ ते ३२९२

निःशेष कांही नेणिजे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087869 · अभंग क्र. ३२१२

3212.
निःशेष कांही नेणिजे । ते शुद्ध ज्ञान म्हनिजे । मा सर्व जे जेणे जाणिजे । ते अज्ञान कैसे बा ॥१॥
ज्ञान ते कवण अज्ञान ते कवण । दोहोंचें लक्षण पाहते पाहा ॥धृ.॥
ज्ञानाचे जे ज्ञातेपण । तया नांवाची अज्ञान । अज्ञानाचे जे ज्ञान । तया नांव शुद्ध ज्ञान ॥२॥
ज्ञान ते अज्ञाना आले । अज्ञान ते ज्ञाना गेले । एका जनार्दनी मुलें । बागुलाचीं दोनीं ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग