वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

न लगे देवा तुझे आम्ह

🙏 3. संत तुकाराम · ABH-080771 · अभंग क्र. ३२०७

3207.
न लगे देवा तुझे आम्हासी वैकुंठ । सायुज्याचा पट्ट न लगे मज ॥१॥
देई तुझे नाम मज सर्वकाळी । मागेन वनमाळी हेचि तुज ॥धृपद॥
नारद तुंबर उद्धव प्रल्हाद । बळी रुक्मांगद नाम ध्याती ॥२॥
सिद्ध मुनिगण गंधर्व किन्नर । करिताती गजर रामनामे ॥३॥
तुका म्हणे हरी देई तुझे नाम । अखंडित प्रेम हेचि द्यावे ॥४॥

अर्थ :
देवा तुझे वैकुंठ नको, सायुज्यमुक्ती नको, एखादे पट्टराज्य देखील आम्हाला नको आहे. हे वनमाळी सदा सर्वकाळ तुझेच नाम मुखामध्ये असावे हेच माझे मागणे तुझ्याजवळ आहे. देवा नारद, तुंबर, उध्दव, प्रल्हाद, बळी, रुक्मागंद यांच्या ध्यानी तुझेच नाम आहे. सिध्दमुनीगण, गंधर्व, किन्नर सर्व रामनामाचाच गजर करतात. तुकाराम महाराज म्हणतात, हे हरी तुझ्या नामाविषयी अखंड प्रेम माझ्या चित्तामध्ये राहावे हेच तुम्ही मला दयावे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग