नरदेहीं येउनीं करी स
3197.
नरदेहीं येउनीं करी स्वार्थ । मुख्य साधी परमार्थ ॥१॥
न होता ब्रह्माज्ञान । श्वान सूकरा समान ॥२॥
पशुवत जिणें । वाया जेवी लाजिरवाणे ॥३॥
सायं प्रातर्चिता । नाही पशुंसी सर्वथा ॥४॥
मरणा टेकलें कलीवर । परी न सांडी व्यापार ॥५॥
एका जनार्दनी पामर । भोगिती अघोर यातना ॥६॥
