शास्त्रज्ञ पंडित हो
3174.
शास्त्रज्ञ पंडित हो का वेदवक्ते । परी हरि भजनी रत वंद्य सदा ॥१॥
भक्तीचे कारण तेणे सरतेपण । वाउगाची शीण जाणिवेचा ॥२॥
मी एक जाणता पैल नेणता । ऐसा विकल्प भाविता पतन जोडे ॥३॥
एका जनार्दनी विकल्प त्यजोनी । विठ्ठल चरणी मिठी घाली ॥४॥
