तुज पाहाता समोरी । द
2996.
तुज पाहाता समोरी । दृष्टि न फिरे माघारी ॥१॥
माझे चित्त तुझ्या पाया । मिठी पडिली पंढरिराया ॥धृपद॥
नव्हे सारिता निराळे । लवण मेळविता जळे ॥२॥
तुका म्हणे बळी । जीव दिला पायातळी ॥३॥
अर्थ :
देवा आता मी तुम्हाला समोर पाहिले व माझी दृष्टी माघारी फिरतच नाही. हे पंढरीराया माझे चित्त तुझ्या पायाकडे गेले आणि माझ्या चित्ताने तुझ्या पायाला मिठीच मारली. एकदाच की मीठ पाण्यामध्ये मिसळविले की ते पुन्हा वेगळे करता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी माझा जीव तुमच्या पायाच्या तळाखाली बळी दिला आहे म्हणजे माझ्या जीवदशेला मी आता सोडून देऊन तुमच्या आत्मस्वरुपात मी विलीन झालो आहे जसे पाण्यात मीठ मिळविले की ते पाण्यापासून वेगळे होत नाही त्याप्रमाणे मी तुमच्या आत्मस्वरुपात एकरुप झालो आहे आता कदापीही वेगळे होऊ शकत नाही.
