वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

का हो पांडुरंगा न कर

🙏 3. संत तुकाराम · ABH-076973 · अभंग क्र. २९८५

2985.
का हो पांडुरंगा न करा धावणे । तरि मज कोणे सोडवावे ॥१॥
तुझा म्हणऊनि आणिकापे उभा । राहो हे तो शोभा नेदी आता ॥धृपद॥
काळे पुरविली पाठी दुरवरी । पुढे पाय स्थिरी राहो नेदी ॥२॥
नको आणू माझे संचित मनासी । पावन आहेसी पतिता तू ॥३॥
तुका म्हणे चाले आणिकाची सत्ता । तुज आठविता नवल हे ॥४॥

अर्थ :
अहो पाडूरंगा तुम्ही माझ्यासाठी का धावत नाहीत तुमच्यावाचून मला दुसरा कोण सोडवील ? अहो देवा मी स्वत:ला तुमचा म्हणून घेतो आणि दान मागण्यासाठी जर मी दुसऱ्यापुढे उभा राहिलो तर ते शोभण्यासारखे दिसणार नाही. काळाने तर माझा खूप जन्मापासून पाठलाग केला आहे तो काही मला एका जागी स्थिर राहू देत नाही. देवा अरे तू मागचे माझे पूर्वसंचित काही मनात आणू नकोस मी पतित आहे आणि तू पतितांना पावन करणारा आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, अरे पाडूरंगा मी तुझे सारखे चिंतन करतो तरी देखील माझ्यावर दुसऱ्याची सत्ता चालावी हे फार नवलच वाटते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग