वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

आता पहाशील काय माझा

🙏 3. संत तुकाराम · ABH-077216 · अभंग क्र. ३०००

3000.
आता पहाशील काय माझा अंत । आलो शरणागत तुज देवा ॥१॥
करी अंगीकार राखे पायापाशी । झणी दिसो देसी केविलवाणे ॥धृपद॥
नाही आइकिली मागे ऐसी मात । जे त्वा शरणागत उपेक्षिले ॥२॥
तुका म्हणे आता धरी अभिमान । आहेसी तू दानशूर दाता ॥३॥

अर्थ :
देवा मी तुला आता शरण आलो आहे आता माझा अंत पाहशील की काय ? देवा माझा अंगीकार तुम्ही करा तुमच्या पायापाशी मला ठेवा आणि तुमच्या या भक्ताला कधीही केविलवाणे दिसू देऊ नका बरे. देवा यापूर्वी मी अशी गोष्ट कधीही ऐकली नाही की तू शरण आलेल्या भक्तांची उपेक्षा केली आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता तरी तू माझा अभिमान धर कारण तु दानशूर दाता आहेस.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग