वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ६. सार्थ अभंग २५०१ ते ३०००

त्राहे त्राहे त्राहे

🙏 3. संत तुकाराम · ABH-077413 · अभंग क्र. २९९०

2990.
त्राहे त्राहे त्राहे सोडवी अनंता । लागो दे ममता तुझे पायी ॥१॥
एकचि मागणे देई तुझी गोडी । न लावी आवडी आणिकाची ॥धृपद॥
तुझे गुण नाम वर्रिन पवाडे । आवडीच्या कोडे नाचो रंगी ॥२॥
बापा विठ्ठलराया हेचि देई दान । जोडती चरण जेणे तुझे ॥३॥
आवडीसारखे मागितले जरी । तुका म्हणे करी समाधान ॥४॥

अर्थ :
हे अनंता मला या त्रासातुन सोडव सोडव सोडव आणि तुझ्या पायाच्या ठिकाणी मला ममता लागू दयावी. देवा मला तुझी गोडी लागू दे एवढे एकच मी मागणे तुला मागत आहे तुझ्यावाचून मला इतर कुणाचीही आवड लागू देऊ नकोस. देवा तुझे गुण नाम मी वर्णन करुन तुझे पोवाडे गायीन आणि तुझ्या आवडीच्या छंदामध्ये मी तुझ्या रंगात नाचेन. हे माझ्या बापा विठ्ठलराया जेणेकरुन तुमच्या चरणाची प्राप्ती होईल असेच दान मला तुम्ही दयावे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी जरी तुला माझ्या आवडीचे दान मागितले आहे तरी पण ते तू मला देऊन माझे समाधान कर.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग