मागे बहुतांसी सांगित
3002.
मागे बहुतांसी सांगितले संतीं । वाया हे फजिती संसार तो ॥१॥
अंधाचे सांगाती । मिळालेसे अंध । सुख आणि बोध काय तेथे ॥२॥
विष खाऊनियां प्रचीत पाहे कोणी । तैसा अधमपणीं गुंतूं नको ॥३॥
एका जनार्दनी जाऊ नको वाया । संसार माया लटिकी ते ॥४॥
