न सरे लुटिता मागे बह
3011.
न सरे लुटिता मागे बहुता जनी । जुनाट हे खाणी उघडिली ॥१॥
सद्धि महामुनि साधक संपन्न । तिही हे जतन केले होते ॥धृपद॥
पायाळाच्या गुणे पडिले ठाउके । जगा पुंडलिके दाखविले ॥२॥
तुका म्हणे येथे होतो मी दुबळा । आले या कपाळा थोडे बहु ॥३॥
अर्थ :
अशी एक जुनाट खाण आहे की जी उघडकीस आली आहे ती खाणी पूर्वी खूप जणांनी लुटली तरी ती संपत नाही. सिध्द महामुनी साधक सर्वगुण संपन्न यांनीच या खाणीचे जतन केले होते. पाळीव माणसाच्या गुणाने भूमीतील धन सापडते त्याप्रमाणेच पुंडलिकाने देखील जगाला पंढरीमध्ये विठ्ठलरुपी धनाची खाण दाखवली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यावेळी पुंडलिकाने ही जुनाट खाण उघडली त्यावेळी मी दरिद्री देखील तेथेच होतो त्यामुळेच माझ्या नशीबाला थोडेफार विठ्ठलरुपी धन आले आहे.
