मृगजळाच्या पुरी गुंत
2995.
मृगजळाच्या पुरी गुंतशीं पामरा । कोण तुज निर्धारा सोडविल ॥१॥
पडशी पतनी चौर्यायंशीं आवर्ती । तेव्हा तुझी गती कैशी होय ॥२॥
जीवी जीवपण शिवी शीवपण । वेगळें ते जाण दोन्ही होती ॥३॥
यातना अनंत तुज भोगविती । तेथे काकुळती कोणा येशी ॥४॥
यमाचे ते दूत मारिती पामरा । का रे संसारा न चुकशी ॥५॥
एका जनार्दनी सांगतो विचार । रामनामे परिकर जप करी ॥६॥
